मुंबई: शिवडीतील इंदिरा नगर परिसरात पावसाळयात साचणाऱ्या पाण्या संदर्भात मनपा अधिकाऱ्यांनी केली पाहणी
Mumbai, Mumbai City | Feb 9, 2024
शिवडी इंदिरा नगर परिसरात पावसाळ्यात पाणी जमा होते व घरात शिरते, विद्युत केबिनमध्ये हे पाणी जमा होते.पावसाळ्या विद्युत पुरवठा खंडित केला जातो,यावर कायमस्वरुपी मार्ग काढण्यासाठी मनपा च्या वतीने इंदिरा नगर जंक्शन ते मस्जिद परिसर पर्यंत, तसेच इंदिरानगर जंक्शन पासून साईबाबा मंदिर फोर्सबेरी रोड पर्यंत ९००. एम. एम.व्यासाची पर्जन्य जलवाहिनी टाकावी अशी मागणी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी पत्राद्वारे केली होती.त्यानुसार (ता.९) फेब्रुवार येथे मनपा अधिकाऱ्यांनी पाहणी केली.