जालना: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची पोलिस पाटील भरती परीक्षा केंद्रास भेट; 24 केंद्रावर 7843 परिक्षार्थींनी दिली परिक्षा
Jalna, Jalna | Oct 12, 2025 जालना जिल्ह्यात पोलीस पाटील भरती 2025 करीता रविवार दि. 12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12.30 वाजेच्या दरम्यान पार पडलेल्या परीक्षा केंद्राना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी भेट दिली. परीक्षा पारदर्शक व्हावी आणि गैरप्रकार होऊ नये याची पाहणी करून, परीक्षा सुरळीत पार पडेल याची खात्री केली. तसेच परीक्षेच्या तयारीचा आणि व्यवस्थेचा देखील यावेळी आढावा घेतला. जालना जिल्ह्यातील पोलीस पाटील संवर्गाची पदभरतीसाठी जिल्ह्यातील जालना सह जिल्ह्यातील सर्व उपविभागात ही परीक्षा घेण्यात आली.