पनवेल: सायबर धोक्यापासून वाचण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी मोबाईलचा वापर जपून करावा - आयपीएस डॉ. बाळसिंग राजपूत
Panvel, Raigad | Oct 15, 2025 ऑनलाईन फ्राड झाल्यास लवकरात लवकर संबंधिताने पोलिस ठाण्यात तक्रार करावी, जेवढी लवकर तक्रार दाखल होईल तेवढे नुकसान कमी होईल, आजच्या काळात जवळचा शत्रू आणि मित्रही मोबाईलच आहे असे सांगताना आज बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास ज्येष्ठ नागरिकांनी मोबाईलचा वापर जपून करावा असे आवाहन आयपीएस डॉ. बाळसिंग राजपूत यांनी केले. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली 'ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता संवाद' कार्यक्रमाचे आयोजन आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी 'सायबर सुरक्षा' या विषयावर ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त स्वरूप खारगे, उपायुक्त अभिषेक पराडकर, उपायुक्त मंगल माळवे, सचिव अक्षय कदम उपस्थित होते.