चंद्रपूर: जिल्ह्यातील ब्रह्मपुरी-आरमोरी मार्गावरील अपघातात एकाच मृत्यू
जिल्ह्यातील ब्रह्मपुरी-आरमोरी मार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात मांगली येथील रहिवासी असलेल्या २४ वर्षीय तरुणाचा द मृत्यू झाला. आनंदराव कार असे या मृत तरुणाचे नाव आहे. एका मिनी पिकअप वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला.सदर घटना आज दि 14 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. अजय कार हा प्रशांत पिलारे यांच्याकडे चारचाकी वाहनचालक म्हणून काम करत होता. नेहमीप्रमाणे तो सकाळी कामावर गेला होता आणि सायंकाळी काम आटोपून आपल्या गावी मांगली येथे परत जात होता.