अकोट: अकोट हीवरखेड मार्गावरील अडगाव बुद्रुक जवळ नाल्याच्या पुरात जेसीबी वाहून आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात वायरल
Akot, Akola | Sep 16, 2025 हीवरखेड मार्गावरील अडगाव बुद्रुक जवळ मालठाणा मार्गावरील नाल्याला मुसळधार पावसामुळे मंगळवारी पूर आला या पुरात जेसीबी वाहून आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. सातपुडा डोंगर रांगांमध्ये मोठा पाऊस झाल्याचे दिसून आले तर हा जेसीबी नाला काठावरील शेतांमध्ये कामावर पुराच्या पाण्यामुळे जमीन खचल्याने नाल्याच्या पुरात वाहुन आल्याचे शक्यता काहींनी या वायरल व्हिडिओवर व्यक्त केली आहे मात्र पुराच्या पाण्यात जेसीबी पडल्याने अनेकांसाठी हा चर्चेचा विषय ठरला.