ब्रह्मपूरी: चोरटी नवेगाव चांदगाव बेलदाटी परिसरात बिबट्याच्या धुमाकुडीने नागरिका भीतीचे वातावरण रात्री आठच्या नंतर घराबाहेर पडणे बंद
ब्रह्मपुरी तालुक्यातील चोरटी नवेगाव चांदगाव आणि बेलदाटी या गावांमध्ये मागील महिन्यापासून दररोज रात्री बिबट्या दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गावकरी रात्री आठ नंतर दारे बंद करून घरातच राहणे पसंत करत आहेत तर पाळीव प्राण्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे