रत्नागिरी :दि 26 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद रत्नागिरी येथे आरोग्य विषयक आढावा व मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न...
219 views | Ratnagiri, Maharashtra | Nov 26, 2025 रत्नागिरी जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य सेवेची गुणवत्ता अधिक प्रभावी व सर्वसामान्य जनतेपर्यंत सुलभपणे पोहोचविण्यासाठी आढावा व मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन सार्वजनिक आरोग्य विभागाचे- आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. आर. एस.आडकेकर यांच्या अध्यक्षतेखाली शामराव पेजे सभागृह, रत्नागिरी येथे पार पडली.कार्यशाळेस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव, तसेच प्र.जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. परवेज पटेल तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समन्वयक व पर्यवेक्षक,आशा गट प्रवर्तक उपस्थितहोतें.