वाशिम: देव दर्शनाला जाणाऱ्या परदेशी भक्तांवर समृद्धी महामार्गावर लोकेशन क्रमांक 212 जवळ काळाचा घाला , बाप लेक दोघे ठार
Washim, Washim | Oct 18, 2025 म्यानमार येथील 6 विदेशी भक्त भारतात दर्शनासाठी आले असता मुंबई वरून खाजगी वाहनाने जगन्नाथ पुरी येथे दर्शनासाठी जात होते. दरम्यान पहाटे दोन वाजताच्या सुमारास चालकाला झोपेची डूलकी लागल्याने सदर वाहन समृद्धी महामार्गाच्या कठड्यावर जाऊन आढळले. या दुर्घटनेत मिन ओंग 33 वर्ष, मिन चित 13 वर्ष या दोघा बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला, तर 60 वर्षीय तिहा नामक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.