साक्री: श्रीक्षेत्र आमळी येथे तीन लाखांहून अधिक भाविक कन्हैयालाल महाराजांच्या चरणी नतमस्तक
Sakri, Dhule | Nov 3, 2025 आमळी येथील यात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी श्री कन्हैयालाल महाराजांच्या चरणी तब्बल तीन लाखांहून अधिक भाविक नतमस्तक झाले. टाळ-मृदंगाचा गजर व श्री कन्हैयालाल महाराजांच्या जयघोषाने मंदिरासह परिसर दुमदुमला होता. अनेक भाविकांनी मानता केली तर अनेकांनी नवसपूर्ती केली.उद्याही भाविकांची दर्शनासह यात्रोत्सवात खरेदीसाठी आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी सकाळी श्री कन्हैयालाल महाराजांच्या पादुकांचे विधिवत पूजन झाल्यावर पारंपरिक वाद्यांच्या निनादात पालखी मिरवणूक निघाली. या यात्रोत्सवामुळे