हवेली: चिखलीत तरुणावर चाकूने वार
Haveli, Pune | Oct 20, 2025 चकना सेंटर चालवणाऱ्या तरुणाला धमकी देऊन, त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले. तसेच त्याच्या दोन मित्रांना मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना चिखलीत घडली. या प्रकरणी केशव मोती विश्वकर्मा (२५, रहाटणी), वकील मस्जिद खान (२०, चिंचवड) या दोघांना अटक केली आहे.