गुन्हे शाखा युनिट 5 चे पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी 7 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार नागपूर शहरातील दारूच्या दुकानात चोरी करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने तांत्रिक माध्यमाच्या साहाय्याने तपास करून ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आला आहे. याबद्दलची सविस्तर माहिती गुन्हे शाखा युनिट 5 चे पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी दिली आहे.