महागाव: नागपूर तुळजापूर महामार्गावर नांदगव्हाण घाटात अपघात, ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रकची धडक, सुदैवाने जीवितहानी टाळली
नागपूर–तुळजापूर महामार्गावरील नांदगव्हाण घाट परिसरात एक अपघात घडला. विरुद्ध दिशेने येणारा एक ट्रक न्यूट्रल अवस्थेत उतारावर येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची घटना दिनांक १४ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे रस्त्यावरून जात असलेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टर ट्रॉलीचे नुकसान झाले असून ऊस रस्त्यावर विखुरला गेला. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.