जालना: *जालना महानगरपालिकेत विद्युत विभागाची बैठक संपन्न; पत्रकारांना बाहेर काढल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह*
Jalna, Jalna | Jul 2, 2026 : जालना महानगरपालिकेत विद्युत विभागाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस भाजपचे गटनेते महेश निकम, विद्युत व शिक्षण सभापती भाग्यश्री सुजित जोगस, उपसभापती वैशाली वैजनाथ राऊत, नगरसेविका संगीता गोरंट्याल, नगरसेवक अमोल ठाकूर, नगरसेवक दुर्गेश काठोठीवाले, उपायुक्त नंदा गायकवाड, उपायुक्त कोमल गावंडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत नगरसेवक अमोल ठाकूर यांनी शहरातील विद्युत सुविधांबाबत विविध मागण्या मांडल्या. अंबड चौफुली ते इंदेवाडी, अंबड चौफुली ते मच्छोदरी कॉलेज, तसेच अंबड चौ