कल्याण: कचऱ्यात सापडलेले सोन्याचे दागिने परत करणाऱ्या कल्याण मधील प्रामाणिक कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरावरून कौतुक
Kalyan, Thane | Nov 28, 2025 कल्याणच्या जय शिव सोसायटी मधील एका महिलेचे दागिने कचऱ्यात गेल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने संबंधित मनपा विभागाला माहिती दिली आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांनी कचऱ्यामध्ये दागिन्यांचा शोध घेतला आहे.ते दागिने प्रमाणिकपणे सदरच्या महिलेला नेऊन दिले. प्रमाणिकपणे आपले दागिने आपल्याला परत दिल्याबद्दल महिलेने कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत,तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.