नागपूर शहर: नागपूर शहरातील गो गॅसवर पुन्हा आयकर विभागाची धाड, शहरात खळबळ
आयकर विभागाने उद्योजक नितीन खारा यांच्या मालकीच्या कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड अंतर्गत चालणाऱ्या 'गो गॅस' वेअरहाऊसवर धाड टाकली.कंपनीकडे एलपीजी सिलिंडर साठवण्यासाठी वैध परवाना नसल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी साठवलेल्या सिलिंडरच्या नोंदींची तपासणी केली.सहा वर्षांपूर्वीही 'गो गॅस'च्या विविध ठिकाणांवर अशाच प्रकारची धाड टाकण्यात आली होती, ज्यात परवान्याशिवाय एलपीजी व्यवहार आढळले होते.