जालना: भोकरदनमध्ये अवैध वृक्षतोडीवर वन विभागाची धडक कारवाई;जालन्यात कारवाई कधी होणार;वृक्षतोडी विरोधात सामाजिक संस्थांचे निवेदन
Jalna, Jalna | May 2, 2026 भोकरदन शहरात अवैध वृक्षतोड व लाकूड साठवणुकीविरोधात वन विभागाने मोठी कारवाई करत सुमारे 8 टन लाकूड जप्त केले आहे. शनिवार दि. 2 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गोपनीय माहितीच्या आधारे संतोषीमाता मंदिर परिसरात छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.परंतु,जालना शहर आणि तालुक्यात वृक्षतोडी विरोधात कारवाई कधी करणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.शिवाय या वृक्षतोडी विरोधात सामाजिक संस्थांनी प्रशासनाला निवेदनही दिले आहे.या कारवाईदरम्यान आंबा,निम व भोकर या प्रजातींचे झाडे आढळले.