ज्यांच्या शेतातील धानाची कापणी पूर्ण झालेली आहे, त्यांनी शासनाचा आदेश येईपर्यंत धान साठवून ठेवावा, नीट वाळवणी आणि ओलावा कमी करून विक्रीयोग्य स्वरूपात जपणूक करावी. शासनाचे आदेश प्राप्त होताच जिल्हास्तरावर धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे आज दि 27 ऑक्टोबर ला 5 वाजता जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही. एस. तिवाडे यांनी कळविले आहे.