पालघर: मनवेलपाडा परिसरात रस्त्यालागत असलेल्या सुका कचरा व झाडाझुडपात लागली आग
विरार येथील मनवेलपाडा परिसरात सुका कचरा झाडाझुडपात आग लागल्याची घटना घडली आहे. नॅशनल शाळेच्या रस्त्यालगत असलेल्या सुका कचरा आणि झाडाझुडपात अचानक आग लागली. आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमनलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही व मालमत्तेचे नुकसान झालेले नाही.