खरीप २०२५ च्या हंगामात निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला असून, कापणी व मळणीच्या ऐन तोंडावर अवकाळी पावसाने धान आणि सोयाबीन सारखी पिके जमीनदोस्त केली. या अस्मानी संकटानंतर प्रशासनाने तत्परता दाखवत अनेक गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले, मात्र याला आता तब्बल तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही प्रधानमंत्री पीक विमा योजनेची दमडीही शेतकऱ्यांच्या पदरात पडलेली नाही.