अहिल्यानगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवास कॉमर्स अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालयातील कबड्डी संघातील खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली नुकत्याच झालेल्या पुणे विभागीय कबड्डी स्पर्धेत 19 वर्षे वयोगटात मुलांच्या संघाने पुणे शहर नगर ग्रामीण पुणे ग्रामीण या संघाचा पराभव करत प्रथम क्रमांक मिळवला आणि सर्व संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पुणे विभागाच्या संघात निवड झाली निवास महाविद्यालयाच्या जिमखाना समोरील कबड्डी मैदानात संस्थाचालकांनी विजयी खेळाडूंचा विशेष सन्मान केला