गडचिरोली: गणेशोत्सव मिरवणुकीत लेझर लाईटवर बंदी: जिल्हा पोलीस अधीक्षक निलोतप्पल यांचे निर्देश
आगामी मसक-या गणेशोत्सव मिरवणुकींमध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी १६ ते २० सप्टेंबर २०२५ या कालावधीत लेझर लाईटच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नीलोत्पल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३(१) अंतर्गत याबाबत आदेश जारी केला आहे.