श्रीगोंदा पोलिसांकडून गंभीर गुन्ह्यातील आरोपींना ‘व्हीआयपी’ ट्रीटमेंट; न्यायालयात मोबाईल वापराची दिली मुभा..? श्रीगोंदा पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक गंभीर घटना समोर आली आहे. गंभीर गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयात हजर करताना त्यांना चक्क ‘व्हीआयपी’ वागणूक दिली जात असल्याचा आरोप काष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. सुभाष कोंडीबा चौधरी यांनी केला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.