अलिबाग: नशेली इंजेक्शन विकणाऱ्यावर कारवाई
अलिबाग पोलिसांनी जप्त केले नशा आणणारे इंजेक्शन
Alibag, Raigad | Nov 7, 2025 जीममधील अथवा इतर साहसी खेळ खेळणाऱ्या तरुणांना नशा येणारे इंजेक्शन विकणाऱ्या आक्षी साखरमधील एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी त्याच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून नशा येणाऱ्या दहाहून अधिक बाटल्या, इंजेक्शन जप्त करण्यात आले आहे. या कारवाईने ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांना दणका मिळाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलिबागमधील साखर आक्षी येथील कोळीवाड्यात एक तरुण मेफेन्टरमाईन गुंगीकारक औषध विकत असल्याची माहिती अलिबाग पोलिसांना मिळाली