खामगाव: पारखेड फाट्याजवळ मालवाहू वाहनाला आग;मोठा अनर्थ टळला
नांदुरा रोडवरील पारखेड फाट्याजवळ १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजे दरम्यान मालवाहुला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत वाहनाचा समोरील भाग जळून खाक झाली असून, सुदैवाने अनर्थ टळला.प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.