साक्री: साक्रीत आदिवासींनी काढला उलगुलान मोर्चा व ठिय्या आंदोलन;त.हसील प्रशासनाला दिले निवेदन
Sakri, Dhule | Oct 14, 2025 साक्री तालुक्यातील सकल आदिवासी समाजाच्या वतीने आदिवासी पेसा संघर्ष समिती,सरपंच तसेच विविध सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून मंगळवारी १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.४५ वाजता साक्री तहसील कार्यालय आवारात उलगुलान मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात आले. पर प्रभारी तहसीलदार दत्तात्रय शेजुळ यांना आदिवासी बांधवांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.या आंदोलनात तरुण वर्गाने मोठ्या प्रमाणात सहभाग घेत न्याय हक्कांसाठी जोरदार घोषणाबाजी केली.