जालना: अमृतवन डंपिंग ग्राउंडला भीषण आग; कचर्याचे ढिगारे जळून खाक; परिसरात धुराचे पसरले लोट
Jalna, Jalna | Jun 12, 2026 जालना शहरातील मोतीबाग परिसरालगत असलेल्या अमृतवन येथील डंपिंग ग्राउंडला शुक्रवारी आग लागल्याची घटना घडली. शुक्रवार दि. 12 जून 2026 रोजी सकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास ही आग लागली. या आगीमुळे कचर्याचे मोठे ढिगारे ज्वाळांच्या भक्ष्यस्थानी पडले असून परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. कचर्याच्या मोठ्या साठ्यामुळे आग लागली.