जिल्ह्यात नोंदणीकृत दिव्यांगांची संख्या 8578 असून दिव्यांगांना ‘युडीआयडी’ कार्ड (स्वावलंबन कार्ड) वितरीत करणे, याचा समावेश आहे. त्यामुळे मिशन मोडवर दिव्यांगांना ‘युडीआयडी’ कार्डचे वाटप करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग सक्षमीकरणबाबत आढावा घेतांना आज दि 4 नोव्हेंबर ला 4 वाजता ते बोलत होते.