अंबरनाथ: आमच्या महिलांना शौचालयात जाऊ द्या, असे म्हणताच गुंडांकडून खानावळीची तोडफोड, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर
बदलापूर परिसरामध्ये गाव गुंडांनी मोठी दहशत माजवली आहे. बदलापूर पूर्व परिसरातील त्रिमूर्ती नावाच्या खानावळीची देखील गुंडांनी तोडफोड केली आहे. आमच्या महिलांना शौचालयात जायचे आहे तुम्ही बाजूला जा,असे म्हणतात गुंडांनी खानावळीची तोडफोड केली. घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी देखील बोलायचे नाही का?असा सवाल उपस्थित करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली आहे.