वडवणी: वडवणी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात धनगर आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले
Wadwani, Beed | Oct 1, 2025 वडवणी शहरातील - छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज धनगर समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून चक्काजाम रस्ता रोको आंदोलन केले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेच्या तत्वांना अनुसरून धनगर समाज अनेक वर्षांपासून आपला न्याय हक्क मिळवण्यासाठी लढा देत आहे. जालना शहरातील अंबड चौफुला येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याच्या नियोजित जागी गेल्या १५ दिवसांपासून दीपक (भाऊ) बोराडे आमरण उपोषण करत आहेत. त्याच उपोषणाला पाठिंबा म्हणून हे आंदोलन केले