मुरुड: कोर्लई गावात विवाहित महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या
Murud, Raigad | Aug 30, 2025 रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोर्लई गावात एका विवाहित तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना २९ ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे. मयत तरुणीचे नाव भाग्यश्री समीर बलकवडे (वय ३२) असून गणेशोत्सवासाठी कुटुंब मूळगाव कोर्लई येथे आले होते. दीड दिवसाचा गणपती उत्सव आनंदात साजरा झाला, परंतु दुसऱ्याच दिवशी अचानक वादातून ही घटना घडली.