भोकरदन: जानेफळ दा.येथे अवैध दारू विक्री अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा,1लाख 23 हजार 780 रुपयाचा मुद्देमाल जप्त
आज दिनांक 7 जुलाई 2026 वार मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील जानेफळ दाभाडी येथे काल दिनांक 06 जुलै 2026 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने हॉटेल पायल येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्री अड्ड्यावर छापा टाकत देशी विदेशी कंपनीची दारूच्या सीलबंद बाटल्या ज्याची अंदाजे किंमत 1लाख 23हजार 780 रुपयाचा मुद्देमाल जप्त करत हॉटेल मालक बद्रीनाथ मिसाळ व हरिदास साळवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.