नागपूर ग्रामीण: नागपुरात घरफोडी: लाखोचा ऐवज लंपास
हुडकेश्वर परिसरात घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी २,७२,५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला ३० जून ते ४ जुलै दरम्यान मंगलधाम कॉलनी येथे ही घटना घडली.चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून बेडरूममधील १५,००० रुपये रोख, सोन्याचे दागिने आणि चांदीचे सिक्के असा एकूण २,७२,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरला. याप्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.