जालना: समाजसेवा अधीक्षकांच्या प्रयत्नांना यश; नऊ महिन्यांपासून बेपत्ता मनोरुग्ण महिलेची नातेवाईकांशी भेट
Jalna, Jalna | Jun 25, 2026 जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षकांच्या अथक प्रयत्नांमुळे मागील नऊ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या एका मनोरुग्ण महिलेची तिच्या कुटुंबीयांशी यशस्वी भेट घडवून आणण्यात आली. गुरुवार दि. 25 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार समाजसेवा अधीक्षक महेंद्र साळवे, विशाखा माने आणि सुनील जोनवाल यांच्या समन्वयातून ही माणुसकी जपणारी घटना घडली. दिनांक 29 मे 2026 रोजी सदर महिला 108 रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी सामान्य रुग्णालय, जालना येथे दाखल झाली होती.