पवनी: नवनिर्मित दुर्गा उत्सव मंडळ येथे 'विदर्भ काशी' महोत्सव दरम्यान सुप्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांच्या भजन संध्याचे आयोजन
Pauni, Bhandara | Sep 29, 2025 नवरात्रोत्सवाचे अवचित्य साधत 26 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यन्त पाच दिवसीय “विदर्भ काशी पवनी महोत्सवा”चे आयोजन करण्यात आले आहे. आम. नरेंद्र भोंडेकर मित्र परिवरा तर्फे आयोजित या महोत्सव दरम्यान विविध सांस्कृतिक व संगीतमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. पवनी महोत्सव अंतर्गत दिनांक 29 सप्टेंबरला सायंकाळी 8 ते रात्री 11 वाजता दरम्यान भक्तीगीत संध्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्या करीता विशेष आकर्षण म्हणून सुप्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांना आमंत्रित करण्यात आले होते.