मनपा प्रभाग क्रमांक १५ मधील मतदार यादीमधील घोळ व त्रुट्या तात्काळ दुरुस्त करा अशी तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने 3 डिसेंबर रोजी मनपा आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, जिल्हा सचिव रामेश्वर पुरी, तालुकाप्रमुख उद्धव गरुड, शहर प्रमुख अंकुश गिरी, संघटना शहरप्रमुख शंकर दामोदर इत्यादींच्या स्वाक्षरी आहेत.