अंबरनाथ: बनावट सोने देऊन दहा लाखाची फसवणूक, मुलाला दोन लाखाची दुचाकी, मग अडकला पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं प्रकरण काय?
अंबरनाथ मध्ये एक व्यक्ती सोन्याचा तुकडा दाखवला आणि असे सोने बनवून देतो असे सांगत एका मेडिकल चालकाकडून दहा लाख उकळले. त्यानंतर खोटे दागिने दिले आपल्याला फसवल्याचे लक्षात येतांच अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये मेडिकल चालकाने तक्रार दाखल केली. अंबरनाथ पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून अत्यंत शितापीने आरोपीला गुजरात मधून ताब्यात घेऊन त्याच्याकडून चार लाखाचा रोख रक्कम हस्तगत करून त्याच्या मुलाला देखील सहभागी असल्यामुळे आरोपी केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.