काटोल: पंचधार येथे गोवर्धन पूजा उत्साहात, काढण्यात आली मिरवणूक
Katol, Nagpur | Oct 22, 2025 दिवाळीचा चौथा दिवस बलिप्रतिपदा हा गोवर्धन पूजा म्हणून आज उत्साहात साजरा करण्यात आला. पंचधार येथे यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली असून यावेळी रेड्याला आकर्षक सजविण्यात आले. तसेच इतरही गाईंना आकर्षक सजविण्यात आले. यावेळी सर्व गाईंना शंकरजीच्या मंदिरात एकत्रित करून त्यांची पूजा करण्यात आली. अत्यंत उत्साहात गोवर्धनपूजा संपन्न झाली यावेळी गावात अत्यंत उत्साहाचे वातावरण होते. तसेच गोपालकांमध्येही आनंदाचे वातावरण होते.