सेनगाव: मंत्री विखे पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेने नोंदविला निषेध
राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्जमाफी वरून केलेल्या वक्तव्याचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्जबाजारी व्हायचं आणि नंतर कर्जमाफी मागायची असे शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी या वक्तव्याचा निषेध केला असून आमच्या शेतीमालाला भाव द्या आमचे आम्ही कर्ज भरू असे देखील गजानन कावरखे यांनी सांगितले तसेच विखे पाटील यांना लाज वाटायला पाहिजे अशा शब्दात निषेध नोंदविला.