शेतकरी, शेतमजूर, निराधार, परित्यक्ता आणि विधवा महिलांच्या कुंटूंबातील मुलींच्या विवाहासाठी शुभमंगल सामुहिक, नोंदणीकृत विवाह योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा कुरसंगे यांनी दिनांक 13 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास केले आहे.