बल्लारपूर: बल्लारपूर येथे आमदार सुधीर मुनगंटीवार विचार मंच सेवा शाखेचे आमदार मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन
बल्लारपूर येथे माझ्या नावाने सुरू झालेल्या सुधीरभाऊ मुनगंटीवार विचार मंच शाखेचे आज उद्घाटन झाले आणि त्या क्षणी हृदयात अपार कृतज्ञतेची भावना दाटून आली. समाजातील वंचितांना आधार देण्यासाठी व उपेक्षितांचे प्रश्न सोडवण्यासाठी तरुणांनी घेतलेला हा उपक्रम त्यांच्या सामाजिक भानाचे जिवंत उदाहरण आहे. तरुणाईच्या या सामाजिक जाणिवेने माझा सेवाव्रताचा संकल्प अधिक दृढ झाला आहे. या शाखेत येऊन नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटणारा समाधानाचा आनंदच माझ्यासाठी आयुष्याची खरी संपत्ती ठरेल.