जालना: जालन्यात श्याम मानव यांचे व्याख्यान; अंधश्रद्धा आणि भोंदूबाबांविरोधात जनजागृतीचा कार्यक्रम
Jalna, Jalna | May 22, 2026 अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांचे बुवा तेथे बाया या विषयावर विशेष व्याख्यान जालन्यात आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्याम मानव यांनी शुक्रवार दि. 22 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता केले आहे. हा कार्यक्रम जालना शहरातील मातोश्री लॉन्स येथे दि. 23 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता पार पडणार आहे. अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात भोंदूबाबांकडून महिलांचे शोषण होत असल्याच्या घटना समोर आल्या.