राजुरा येथील चुनाळा पॉइंट,बिरसा मुंडा चौक येथे धरती आबा क्रांतिसूर्य,भगवान जननायक बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आज दि १५ नोव्हेंबर ला १२ वाजता भव्य पुतळा अनावरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक,सामाजिक बांधव आणि तरुणाईने मोठ्या संख्येने हजेरी लावली. कार्यक्रमाला दशरथ कुडमथे,भाऊजी कनाके,मधुकर कोटनाके,डॉ. लहू कुडमथे,धीरज मेश्राम,धनराज कुडमथे, विजय परचाके आदींसह उपस्थित होते.