भद्रावती: शिक्षण विभागाच्या बाल चित्रकला स्पर्धेत वायगाव येथील हर्षल कुरेकार जिल्ह्यात प्रथम.
जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत गट क्रमांक ४ मधून जगन्नाथ बाबा विद्यालय, वायगाव शाळेचा विद्यार्थी हर्षल संजय कुरेकार याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. हर्षलने स्वच्छ भारत या विषया अंतर्गत चित्र रेखाटले होते. शिक्षण विभाग त्याला रोख रक्कम देऊन गौरविणार आहे. पथम क्रमांक पटकाविल्याबद्दल हर्षलचे गावात सर्वत्र कौतुक होत आहे.