नागपूर ग्रामीण: महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठातील रॅगिंग प्रकरण: पोलिसांकडून वस्तुस्थिती स्पष्ट
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर येथे घडलेल्या रॅगिंगच्या प्रकरणाबाबत पोलीस प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. या प्रकरणी बुटीबोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेतील लागू तरतुदींनुसार, संबंधित विद्यार्थ्यांना सूचना पत्र बजावून चौकशीसाठी बोलावण्यात आले.