गोंदिया पोलीस दलातील रोजच्या कामातील व्यस्ततेमुळे पोलीस अधिकारी अंमलदार यांच्यावर मोठ्या प्रमाणात मानसिक ताणतणाव येत असतो.त्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक मानसिक आरोग्यावर तसेच पारिवारिक जीवन,कामकाजाच्या ठिकाणी दिसून येतो.शरीर निरोगी राहण्याकरिता योग्य आहार स्वस्थ जीवनशैली आणि मनाची अवस्था या गोष्टी आवश्यक असून निरोगी स्वास्थ्यासाठी संतुलित आहाराची महत्त्वाची भूमिकी आहे.त्या दिशेने पोलीस मुख्यालय येथे जीवनशैली निरोगी ठेवण्याकरता संतुलित आहार या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.