जालना: मौजपुरी शिवारात दोन वीजेचे खांब कोसळले; शेतकर्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष, नागरिकांचा संताप
Jalna, Jalna | Apr 27, 2026 जालना तालुक्यातील मौजपुरी शिवारातील गट क्रमांक 156 मधील दोन वीजेचे खांब 17 एप्रिल 2026 रोजी कोसळल्याची घटना घडली असून, याबाबत वारंवार तक्रार करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी आणि शेतकर्यांनी केला आहे. सोमवार दि. 27 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार रामनगर येथील अभियंता यांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे शेती आणि या भागातील नागरीक अंधारात आहेत. विजेचे खांब कोसळल्याच्या घटनेनंतर नागरिकांनी माहिती दिली होती.