देऊळगाव राजा: पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक संपन्न -दुर्गा उत्सव व श्री बालाजी यात्रा शांततेत संपन्न करा अप्पर पोलीस अधीक्षक
देऊळगाव राजा दिनांक 29 सप्टेंबर रोजी दुपारी ३वाजता देऊळगावराजा पोलीस स्टेशन येथे अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आगामी श्री बालाजी यात्रा उत्सव व दुर्गा उत्सव संदर्भात शांतता समितीची बैठक संपन्न झाली . या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी कदम मॅडम व शांतता समितीचे सदस्य प्रतिष्ठित नागरिक व्यापारी पत्रकार आदींची उपस्थिती होती उपविभागाचे सर्व पोलीस स्टेशनचे ठाणेदार हजर होते .आगामी सण उत्सव शांतते संपन्न करा असे आव्हान अप्पर पोलीस अधीक्षक यांनी केले