जळगाव: वादळी पावसामुळे शिवतीर्थ मैदानावर फटाक्यांच्या दुकानांचे पत्रे उडाले; व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान
जळगाव शहरात बुधवार २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे जी.एस.मैदान येथील फटाका मार्केटचे मोठे नुकसान झाले आहे. दिवाळी तोंडावर असताना झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे फटाका व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.