"भाजपच्या आमदारांनी केवळ हवेत दंड थोपटून आपली ताकद दाखवण्यापेक्षा, जर त्यांच्यात खरी धमक असेल तर त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन जिंकून दाखवावे," अशा आक्रमक शब्दांत भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या महिला जिल्हाध्यक्ष तथा काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या पराभूत उमेदवार जयश्री बोरकर यांनी आमदार परिणय फुके यांना प्रतिउत्तर दिले आहे. बोरकर यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर थेट हल्ला चढवला. त्यांनी स्पष्ट केले की, लोकशाहीमध्ये जनतेचा विश्वास संपादन करणे महत्त्वाचे असते; त्यामुळे ईव्हीएमचा आधार