ऊर्जानगर वसाहतीजवळील अंभोरा मार्गावर वाघाचे दोन बछडे वावरताना काल सायंकाळच्या सुमारास आढळले. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनलगत चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राची मोठी वसाहत आहे. या परिसरातून मोठा नाला वाहत असल्याने येथे वाघ, बिबट तसेच इतर वन्यप्राण्यांचे वास्तव्य असते. मात्र, आता थेट ऊर्जानगर वसाहतीलगतच्या अंभोरा मार्गावर वाघाच्या बछड्यांची जोडगोळी वावरताना दिसून आली.